कथा पांडू आणि बंडू ची – भाग -१

आपलया कडे कथा कथन हे नेहमीच एक प्रभावी माध्यम म्हणून वापरलं गेलं. किर्तनकार, प्रवचनकार ह्या मंडळी तर हक्का ने कथा सांगतात. पु. लं. चे हरी तात्या हे काय एकटेच पुराव्याने सांगत नाहीत. असे अनेक हरी तात्या आज कार्पोरेट क्षेत्रात कथा सांगून करोडो रुपये मिळवतात. फक्त तिथे त्याला स्टोरी टेलिंग असं आधुनिक नावं दिलं गेलं. शिळ्या कढीला ऊत आणताना नवीन पॅकेजिंग केलं की आपल्या कडे जनता खुळी होतेच.

बरं आम्ही आपले पडलो संघ वाले, संघात बौद्धिक हा एक फार महत्त्वाचा असा सोहळा. हो सोहळाचं ! कारण ती एक संधी असते आपल्या पेक्षा जास्त अनुभव आणि कर्तृत्व असलेल्या सुयोग्य माणसाला ऐकण्याची. अगदी सर्वोत्तम करंट फ्लो होतो तिथं, कारण बौद्धिक घेणारा माणूस हा नक्कीच ऐकणाऱ्यांपेक्षा जास्त पोट्यानशिअल ला असतो. झालं कि मग ‘हाय’ टू ‘लो’ विद्युतधारा चालू. मग त्यात कथा, संदर्भ ,इतिहास, भूगोल ठासून भरलेला असायचा. तिथं ऐकलेल्या कथा आयुष्यभर साथ देत राहतात. ‘अजयराव तेलंग’ Ajay Telang म्हणजे तर चालतं बोलतं विकिपीडिया. युपीएसीचा अभ्यास करणारा, जर अजयरावां बरोबर राहीला तर १०-१२ वेळा अधिकारी होईल इतकं अगाध ज्ञानभांडार . त्यांचाही भर कथा कथना वर जास्त.

अपसूक च मला त्याची सवय लागली. आपला श्रोता कोण? त्याच्याशी रेपो कसा तयार करायचा? हा प्रत्येक शिक्षकाला भेडसावणारा प्रश्न. त्यात न आवडणारा, कमी यश मिळणारा विषय अधिक सोपा करून सांगायचं म्हणजे अजून अवघडं. ह्याला एकच ऊपाय ! विद्यार्थ्यांवर प्रभाव पाहिजे. त्यांच्या मनावर राज्य करत असतानाचाच, त्यांच्या बुद्धीला गारुड घालता आलं पाहिजे. मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवताना हेच केलं. आणि त्यासाठी कथा कथन हे एक प्रमुख साधन मी वापरलं, वापरतोय.

वाचन व्यापून टाकलेले पु.ल, आणि आयुष्य व्यापुन टाकलेला संघ ह्या दोघाना त्याच श्रेय.

आज कथा कथन विदयार्थी सोडून इतरांसाठी सुद्धा करावं वाटलं. अर्थात त्याला तसं कारण ही आहे आणि हीच ती अचूक वेळ ही आहे.

मला नेहमीच वाटतं , “प्रगतीचा वेग हळू असला तरी तो दृश्य पाहिजे” ,कारण प्रत्येकालाच पुढं जाण आणि ध्येय गाठणं ह्यातला फरक कळतो असं नाही.

बऱ्याच वेळेला काही जण जे बघू शकतात ते इतरांना दिसतच असं नसतं. काळाच्या पुढं पाहणं हा काही प्रत्येकाला लाभलेला गुण नसतो. जे काळाच्या पुढचं बघू शकतात, त्यांच्या विचारांचा वेग अर्थातच इतरांपेक्षा जास्त, विचार मांडण्याची त्यांची शैली इतरांपेक्षा अधिक आक्रमक, आणि कामाचा आवाका खूप मोठा असतो. अशी लोक हांतुरणात पाय बसतात का नाही, ह्याच्या मागे न लागता, स्वतःच्या हांतरूणाचा आकार वाढवण्यासाठी कटीबद्ध असतात. आपली स्वप्नं एकदा आपल्या अडचणीं पेक्षा मोठी झाली की मग आपसूकच कार्यक्षेत्राच्या सीमा , समस्यांना तोंड देण्याची इच्छाशक्ती आणि संघर्ष करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता विस्तारत जाते. अशी माणसं हा नेहमीच चेष्टेचा विषय असतात. अवहेलना हि त्यांच्यामागे सावली प्रमाणे लागलेली असते. त्याच्या माघारी त्यांना नावं ठेवणं, ते कसे चूक आहेत, ते कसे फसवे आणि खोटारडे आहेत, ते जे सांगतायत ते कसं दिवास्वप्नं आहे, हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो. ते कसं मोठं मोठं बोलतात ह्या कडे लक्ष वेधलं जात असतं. एकंदरीतच भौतिकशास्त्रातलं घर्षण इथं मानवी असुयेच्या कोइफिशन्ट सकट आलेलं असतं.

मग बरेंच तरुण/तरुणी ह्या घर्षणाला बळी पडतात. “साध्यं”, टप्प्यात आलेलं असताना काही जण परावृत्त होतात. लोक काय म्हणतात ह्या पेक्षा आपल्याला काय वाटतं त्याला महत्व द्यावं कि नाही ? सगळ्यांना डावलून पुढं गेलो ही आणि अपयशी झालो तर..? एक प्रश्न, पडला की मग, मागून एक प्रशपत्रिकाचं आपल्या समोर येऊ लागते.

मग येतो शेवटचा टप्पा जिथं, प्रश्नाची जागा समस्येंन घेतलेली असते. समस्या असते “मीच का?” आणि इथंच त्यांचा परमेश्वर त्यांची सगळ्यात कठीण परीक्षा घेत असतो. पु.लं. एका पत्रात त्यांच्या स्नेह्याला मृत्यू बद्दल लिहितात की जेव्हा जगणं जस्टिफायेबल होईल तेव्हाच मृत्यू ला जाब विचाराता येईल. अगदी तसेच बरच चांगलं काही नियती आपल्याला देत असते तेव्हा आपण हेच “मीच का” विसरतो. आणि आठवतं संघर्ष्याच्या वेळी.

“मीच का??” कारण तू पुढचं बघू शकतोयस किंवा वेगळा विचार करू शकतोयस म्हणून. तूच…

सदरची कथा अश्या अनंत तरुणांसाठी माझ्या कडून भेट. कुणी ती आधी वाचली असेल. कदाचित मसुदा तोच पण आशय वेगळा असेल.

थेट कथे कडे जाण्या आधी थोडं हे कोडं अधिक समजून घेऊया.

दोष नक्की कुणाचा असतो? काळापुढचं बघू पाहणाऱ्यांच की न बघू पाहणाऱ्यांच ? चुकतं कोण असतं, स्वतःचं हांथरुण मोठं करायचा विचार करणाऱ्यांच की पाय पोटात घेऊन आहे त्यात भगवणाऱ्यांच? वेळ फुकट कोण घालवत असतं. आपले विचार समजण्याची क्षमता ज्यांच्या कडे नसते त्यांना ती समजून सांगणाऱ्याच की ते विचार कसे चूक आहेत हे सिद्ध करायची जिद्द करत असलेल्यांच?

हा संघर्ष अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार. समाजाच्या नाण्याच्या ह्या दोन बाजू असतात. त्या दोन भिन्न प्रवृत्ती एकाच वेळी समाजाचा गाडा समतोल करीत असतात. फक्त जो पुढचं बघू शकतो त्यानं खूप सावध असण गरजेचं असतं. कारण पुढचं न दिसणाऱ्याचा काहीच दॊष नसतो. ज्याला दिसून ही तो काही करू शकत नाही तो मात्र गुन्हेगार ठरतो.

मराठीत एक खूप छान गाणं आहे. ” एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…. “. त्याचं शेवटचं कडवं खूप अप्रतिम आहे.
” एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले,
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले,
पाण्यात पाहताना चोरूनी या क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक “.

“साक्षात्कार ” हा शब्द योग्य आहे ह्याला. सदरचा साक्षात्कार सगळ्यांना झाल्या गत वाटू शकतो. तो पुन्हा पुन्हा पडताळला पाहिजे. “इल्युजन” , स्वतः बद्दल फाजील आत्मविश्वास नाहीय ना ह्याची चाचपणी करून मगच पुढं सरकलेलं कधीही चांगलं. आपल्या ध्येया पासून विचलित न होणं. सोप्या मार्गानं पटकन यश मिळावं असं न वाटणं. प्रलोभन, मोठेपणा ह्या पासून दूर राहणं . अश्या एक ना अनेक नैतिक जबाबदाऱ्या ह्या साक्षात्कार्यावर लादल्या जाणार असतात.

माझी कथा ह्याच दोन प्रवृत्तीच दर्शन घडवते. अर्थात ती माझी नाहीय. पहिल्यांदा मला ती Omkar Kulkarni ने सांगीतली. मग पुन्हा ती माझ्या वाचनात आली. मी फक्त वाहक. सेवेची ठायी तत्पर.

आता कथा म्हटलं की पात्र आली, मग त्यात तुलना आली. इथेच माझ्या मदतीला अशोक मामा आले. “अशोक सराफ”. ते नाही का “कळतं नकळतं” सिनेमात त्यांच्या भाचा आणि भाच्ची ला पटवताना एक गाणं गातायत. हा करेक्ट “नाकावरच्या रागाला औषध काय?”…. त्याच गाण्याचं शेवटचं कडवं म्हणजे आमची दोन पात्र….. ते नाही का म्हणतं आहेत.

” मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची !
पांडूची , बंडूची ,पांडू आणि बंडूची ….
पांडू आणि बंडू दोन होती मुलं.
एक होत शहाणं एक होत खूळ..
पांडू होता हुशार बंडू होता मठ्ठ ….
पांडू ऐके आईच बंडू करी हट्ट….
पांडू होत्या पठ्ठया बंडू होता रड्या
पांडू खाई पेढे बंडू खाई छड्या
पांडू होता गुणी बंडू होता हूच ….
मी आहे पांडू आणि बंडू कोण ??
तूच तूच… ”

जेव्हा आपली कथा संपेल तेव्हा एकमेकांकडे बोटं करुन , तूच म्हणावं वाटेल पण म्हणू नका. कारण फक्त हि कथा आहे. तुमची, माझी आपल्या समाजाची व्यथा नाही.

तर मग भेटू भाग-२ मध्ये !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s