विशेष

अंतर …. ऊंची आणि खोली मधलं !

परवा विमानातून दिवसा प्रवास करायचा योग आला. खिडकी ची सीट मिळाली नाही. पण पुरेसा प्रकाश असल्यानं बाहेरचं दिसत होतं.

धाव पट्टीवर विमान एका बे मध ऊभं होत. आमच्या आधी इतर एयर लाईन्स चे विमान उड्डाण करत होते. अचुक 06:20 मिनीटे झाल्यावर आमचं प्लेन मुख्य धावपट्टी वर आल. प्रचंड वेग पकडून धावू लागल तस आपसुक डोळे खिडकी कडे वळले.

आता एव्हाना विमान आकाशात झेपावलं होत. जमीन सोडतानचा तो क्षण नक्किच विलक्षण असतो मग तुम्ही कितिही वेळेला प्रवास केला असुदे. पण आपल सर्वस्व आपण कुणाला तरी देऊन, त्याच्या वर विश्वास ठेउन आपण त्याक्षणी अवकाशात झेपावत असतो.

प्रत्येक क्षणी विमान वर जात होत तस पृथ्वी च थोड जास्त मोठ क्षेत्र दिसू लागत होत. आता विमान पुन्हा पृथ्वीला समांतर झाल आणी स्थिरावल. आता पुढच्या काही क्षणात ते आणखी वर जाणार होत आणी मग फक्त ढग च दिसणार होते. अगदी ढगांवर स्वार होण्यच फिलींग येणार होतं. पण तितक्यात एक विचार मनाला हळुच स्पर्श करुन गेला. एखादा सूर्यकिरण ढगावर पडून त्याचा पृथक्करण व्हावं असच कहीच विचारच पृथक्करण घडलं असेल.

खाली बघताना कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ची यमुना दिसत होती. रस्ते,वाहन, गर्दी सगळ काही फक्त इतक्या उंची वरुन हे सगळ बघताना अवाका वाढला होता.

खालून जेव्हा आपण विमाना कडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त ते विमान दिसत. पण वरुन खाली बघताना खुप काही दिसत. फरक फक्त दोन शब्दांचा नाहीय खुप काही बदलत.

एकिकडे जीला उंची म्हणतो तीच दुसरी कडे खोली असते. आणी ह्या दोन्ही मधे तेच स्तब्ध अंतर….

त्या उंचीवर जाऊन जे दिसत ते खालून दिसुच शकत नाही. हे अंतर पार करुन जाण म्हणजेच आपल आयुष्य असेल कदाचीत.

एकदा एखादी उंची गाठली की खुप प्रश्न अपोआप सुट्तात असल ऐकलं होत. मला वाटत ते अपोआप सूटत नाहित. ते सहज गत्या सोडवण्याचा दृष्टीकोन मिळतो.

हा फक्त अपेक्षीत उंची गाठली तरी पुन्हा खाली कोसळण्याची शक्यता सतत जीवंत ठेवावीच लागणर. जसे विमानात मधून मधून टरब्युल्ंस येतात अगदी तसच.

एकी कडे मुळे खोलवर पसरलेलं झाड खुप वर्ष जगत अस विचार करणार्या मला उंचीच महत्व सांगणारा तो एक विलक्षण क्षण होता.

योगयोग का काय माहीत नाही पण खालच दृश्य दिसण बंद झाल तेव्हा हेडफोन मधे कडवं वाजत होत.

“सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती.
पंखास या बळ दे नवे,झेपावण्या आकाश दे

जे सत्य सुंदर सर्वथा,आजन्म त्याचा ध्यास दे…”

उत्सव पुलंदैवताचा

“प्रत्येकाच्या वाटयाला एक दुःखाचा आणि आनंदाचा ठराविक कोटा असतो. त्यातला दुःखाचा कोटा लवकरात लवकर सपंवुन टाकावा म्हणजे मग उरतो तो फक्त आनंदच आनंद….!”

जगाला हसवायचं व्रत घेऊन आलेल्या एका स्वर्गीय गंधर्वाचा आयुष्या बद्दलचा दृष्टीकोन. माझ्या साठी हा सिनेमा नव्हताच. मला आज दिवाळी साजरी केल्याचं फिलिंग आलं. मला पु. ल. भेटले नसते तर मी आज जसा आहे, तसा नसतो. माझ्या साठी पु.लं. हे फक्त लेखक असूच शकत नाहीत. तत्वज्ञानाला हास्याची भरजरी झालरं लावून, ते जगासमोर मांडणारे ते एकटेच असतील आणि राहतील. हसून हसून डोळ्यात पाणी आलेलं असताना अचानक एखाद वाक्य, पाणवलेल्या डोळ्यात अंजन घालतं तेव्हा लिखाणातला सहजपणा कसा सजगपणा आहे ते कळतं.

लहानपणी, सुट्टीत सोलापूर ला राहायला जायचो. तेव्हा आज्जी पुस्तकं वाचायला द्यायची. अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीला ते नको वाटायचं. बाहेर बोंबलतं फिरणं ह्या शिवाय जगात काही असतं ह्यावर माझा विश्वास च नव्हता त्या काळात. उगार ला असलं की पोहायला, चाळीत खेळायला किंवा ऊस अड्ड्यात ऊस तोडायला जाणं हि खरी आवड. मिरजेत सायकल वर टांग मारून गावभर फिरणं ह्या सारखं सुख नव्हतं. सगळ्या आणि सगळ्यांच्या बातम्या इत्यनभूत माहिती असणारा माझ्या वयाचा दुसरा तुम्हाला चुकूनही सापडला नसता. अश्यात सोलापूर ला गेलं की आजीची ती कडक शिस्त थोडं दडपण निर्माण करायची. पण अगदी अन्नपूर्णे सारखी प्रेमळ काकू आणि बिन्दास्त, स्पष्टवक्ता आणि प्रचंड जिव्हाळा असलेले काका ह्याची ओढ आजीच्या शिस्तीवर मात करायची. त्यात भरीस भर म्हणून सश्या सारखा गोंडस, शिंकला तरी लालबुंद होईल असा पण तितकाच संवदेनशील प्रणवभाऊ त्याच्या सोबत राहायला भाग पाडायचा. अहमदाबाद हुन आलेली धाकटी बहीण आणि प्रचंड लाड करणारे मोठे काका हेही तस आकर्षणच. बारा लोक बदाम सात खेळायची मज्जा त्यांनतर कित्येक वर्षात आलेली नाही. एकंदरीतच आयुष्यातल्या चार पाच सुट्ट्या खूप आठवणी देऊन गेल्या.

सहावीतुन सातवीत जायच्या सुट्टीत, एक दिवस दुपारी जेवणा नंतर आजीने बोलावून घेतलं. आता काय फर्मान निघतं? अशी भीती पोटात गोळा उठवत होतीच, तिच्या खोलीत पळत जायला फारसा वेळ लागला नाही. आत गेल्या गेल्या तीनं एक लाल, बायंडिंग कव्हर, असलेलं भलं मोठं पुस्तकं दिलं आणि ह्या सुट्टी मध्ये हे वाचून संपलं पाहिजे असं सांगितलं. प्रचंड दुःख उरात बाळगून मी ते हातात धरलं. “ठीक आहे!” अस मना विरोधात जाऊन म्हंटलं आणि बाहेर आलो. हॉल मध्ये आजोबा माझ्या कडे बघून हसले आणि त्यांनी , “हा चालू करा” असं म्हणल्यावर मला अजून दुःख झालं. कारण माझी अवस्था त्यांना कळून ही ते मला मदत करीत नाहीत हि खन्त मला जास्त टोचत होती. शेवटीं तोंडाचा चंबू करून मी ते पुस्तक उघडलं आणि त्याच्या पहिल्या पानावर लिहिलं होतं, “श्रीमान योगी”!

आयुष्य बदलवणारा तो क्षण आहे हे तेव्हा मला कळालं नाही. मला त्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर काही तरी नवीन भेटलं. “शिवाजी” ही तीन अक्षरं ह्र्दय आणि बुद्धी वर गोंदवायचं काम त्या पुस्तकानं पार पाडलं. ते पुस्तक चार दिवसात वाचून संपलं, पण वाचन अजूनही चालूच आहे. त्या पुस्तकानं मला, वाचायला शिकवलं आणि हे त्या आजीमूळ घडलं. तीनं त्या दिवशी ते पुस्तकं हातात दिलं नसतं तर मी कदाचित फार मोठं काही तरी गमावलं असतं.

त्याच्या पुढल्या सुट्टीत संघ कार्यालयात एक कपाटभरून पुस्तकं असल्याचं मला कळालं. मी थेट आमच्या आशिष गोसावींना गाठलं आणि आम्ही दोघांनी हेमंत ला बरोबर घेऊन तिथंच एक वाचनालय थाटलं. पुस्तकं वर्गिकृत केली, रजिस्टर तयार केलं आणि वाचन चालू झालं. साधारण सहा महिने मी त्यातून पुस्तकं वाचत होतो. पेशवाई, राजाशिवछत्रपती, माझी जन्मठेप, “हू वेअर शूद्राज?” च मराठी भाषांतर पण त्यात असल्याचं मला आठवतं. त्या काळात मी प्रचंड वाचन केलं आणि त्याची टिप्पण हि काढून ठेवली. आशिष शिक्षकांनी दिलेलं व्हिजन २०२० आज हि माझ्या कपाटात आहे.

पुढं इयत्ता नववी मध्ये मी असताना श्री. ताम्हनकर सरांच्या बोलण्यात “पु.लं.देशपांडे” हे नाव ऐकलं त्या बद्दल शोधलं आणि मग मीरा मामीच्या खरे मंदीर वाचनालयाच्या कार्डवर “व्यक्ती आणि वल्ली ” काढून आणलं. तिनं मला फक्त कार्ड दिलं नव्हतं ते माझ्या साहित्य प्रवासाचं तिकीट होतं. मला इथं “पु. लं.” सापडले आणि मग मात्र मी त्यांना घट्ट धरूनच ठेवलं. जे जे मिळालं ते वाचलं, ऐकलं. पुढं युट्युब वर ही बरीच साधनं मिळाली. जितकं वाचाल, तितकं गुंतूत जालं. जणू ती एक चुंबकीय शक्ती आहे. पुढं त्याची धुंदीच चढली आणि आता ती कधीच उतरू नये असं वाटतं.

वर्गात शिकवताना मी सतत विनोद करत राहतो कारण, हसणारी आणि शिकणारी मुलं जेव्हा एकरूप होतात तेव्हा भगवंत भेटल्याचा भास होतो. आशीर्वाद मिळाल्या गत वाटतं. माझ्या कडे आज जी काय थोडी फार विनोद बुद्धी आहे ती पु. लं ची देण. यशस्वी झालं नाही तरी एक वेळ चालेलं, पण आनंदी झालं पाहिजे ही भाईंची खरी शिकवणं. आयुष्याचा क्षण आणि क्षण, सुख-दुःखाचा कण आणि कण आनंदानं भरभरून टाकण्याची ईच्छा निर्माण करणारा हा अवलिया. हरितात्यांची काक दृष्टी, अंतू शेठ चं जीवनाचं मार्मिक तत्वज्ञान, चितळे मास्तरांच्या झिजलेल्या चपला आणि विद्यादानाचं व्रत, नाथाकामतांचा रंगेल पणा, नारायणाची इतरांना मदत करण्याची वृत्ती, रावसाहेबांचा निरागस आपलेपणा, घर बांधताना ते बळजबरीनं दाखवणारा पु. लं. चा अजात शत्रू हे सगळे जण आयुष्य कडे बघण्याचा एक जबरदस्त सकारात्मक दृष्टिकोन देतात. जखमी म्हैस काय काय दाखवून गेली त्यांना? निरीक्षण आणि त्याची ताकद इथे पुन्हा पुन्हा अधोरेखीत होते. जन्म आणि मृत्यू ह्या प्रवासामध्ये पैसा, घर, गाड्या आणि इतर अनेक भौतिक गोष्टीं महत्वाच्या नसून आपल्याला भेटणारी माणसं आणि त्यांचा-आपला स्नेह हेच काय तो महत्वाचा टेकअवे आहे हे सांगूनच जणू भाई निघून गेलेत, फक्त शरीरानं …!

महेश मांजरेकरांनी एक उत्तम कलाकृती दिली आहे. भाई जितक्या पटकन समजतात, भावतात तितक्या लगेच सुनीता बाई भेटत नाहीत. पण ह्या सिनेमानं भाईंच्या आयुष्यातलं सुनीताबाईंचं स्थान खूप सुंदर रित्या रेखाटलं आहे. जगातल्या प्रत्येक पुरुषोत्तमाला ,लक्ष्मणा सारखे पिता मिळावेत असंही वाटून जातं. आपल्या सारखेच सर्वसामान्य वाटणारे भाई, नक्की कसे वेगळे होते ते अतिशय नीटनेटके पणे मांडलं आहे. पंडित वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी , पंडित कुमार गन्धर्व, जब्बार पटेल, बा. सी. मर्ढेकर, गदिमां ही सगळी माणसं भाई ह्या धाग्यानं गुंतली गेलीयत आणि त्यांना एकत्र बघणं म्हणजे एक संधीच आहे. भाई आणि सुनीता बाईंचं झालेलं लग्न ज्या प्रकारे झाल्याचं दाखवलं आहे तो म्हणजे तर आपल्या पिढीनं शिकण्या सारखा प्रसंग आहे.

पुस्तकात भाई दिसतात, सिनेमात भाई भेटतील !

सिनेमा जरूर बघा !

“बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”-भाग-१

“बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”-भाग-१

काल सकाळी उठतानाच तीन मला गाठलं ! तसा तीन चार दिवसांपासून मी, तिच्या पासून लांब पळत होतो, तिला टाळता येत नसलं तरी, ती खरंच नको होती. कारण ती येणार,बिलगून बसणार, मग तिला कुरवळावं लागणार, तिचे चोचले पुरवावे लागणार, अटेन्शन द्यावं लागणार, ह्या सगळ्या पेक्षा तिला योग्य अंतरावर ठेवणेच योग्य असं वाटत होत. पण काल ती आलीच…! सकाळचा गजर झाला, रात्रीची सगळी स्वप्न, हांथरुण गोळा करताना, शोधत होतो. तेव्हा ती दिसली आणि मी हार मानलीच. तिच्या त्या घट्ट मिठीने, एकदम कडक ! शिंक आली. गुलाबी, रेशमी थन्डीची अवखळ मैत्रीण “सर्दी”, सुद्धा मला पुन्हा एकदा भेटली. आता मात्र ऑफिस मध्ये मेसेज केला की मला यायला वेळ लागेल कारण कुणाला तरी घेऊन बाहेर जाऊन जायचं आहे.

तिला तो स्पिरिट चा गंध बाकी फार आवडतो, इंजेक्शन ची सुई मला टोचते पण आनंद हिला होतो. मग डॉक्टर माझी अजात शत्रू असणाऱ्या “विश्रांतीला” भेटण्याचा सल्ला देऊ लागतात आणि मग मला समजत कि हाच तो क्षण, हीच ती वेळ जिथं आपण निघावं. तिथून तडक हिला घेऊनच मी ऑफिस ला निघालो.

जाताना मनात अनेक विचार गर्दी करून रांगेत उभे होते आणि सोबत हि सर्दी. ती अशी कधीतरी,अचानक येऊन एक मात्र जाणीव करून देते कि आपलं शरीर हि थकत. हि जाणीव होताच, आपल्या वर हि नियंत्रण ठेवणारा, निसर्ग ,म्हणून कुणी तरी आहे हे समजत ! त्या साठी मात्र तिचे धन्यवाद….!

ऑफिस ला पोहोचलो आणि काम सुरु झालं, थोड्या वेळांन जयदीप म्हणाला सर माणसानं आठवड्यातून दोनदिवस तरी सुट्टी घेतली पाहिजे. ” जरा बदल पाहिजे ना…!” तसा तो मस्करीत म्हणाला होता, पण बऱ्याच दिवसात “बदल” ह्या शब्दाचे “बादल” आमच्या मनाच्या अवकाशात अगदी दबा धरूनच बसले होते. झालं! हे निमित्त त्यांच्या विचारधारा करायला पुरेसं होत आणि मग आज कीबोर्ड वर प्रेम उफाळून आलंच!!

बदल तीनच अक्षरं पण खरच आयुष्यं ह्या भोवतीच घुटमळत असतं. आज त्या बद्दलच थोडं ! मला हा बदल दोन वेगळ्या वेगळ्या अनुषन्गाने इथे अभिप्रेत आहे. पहिला बदल एक सुट्टी, थोडी विश्रांती किंवा एखाद नवीन हॉटेल, चवीत बदल म्हणून जस कि , “जस्ट फॉर चेंज”, आणि दुसरा बदल माणूस म्हणून आपल्यात कराव्या लागणाऱ्या सुधारणा….. म्हणजेच “दि चेंज” , “ट्रान्सफॉर्मेशन “!

खरं बघितलं तर बदल हा निसर्गाचा एक अलिखित पण अपरिहार्य नियमच !

मोहरणारा वेल, पिकणारा फणस, गाणारा कोकीळ, नाचणारा मोर, पहिल्या पावसानंतर दिसणारी हिरवळ, झडणारी पानं, सुकणारी फुलं, दिवस आणि रात्री मधला सोनेरी संधीकाळ, दरवर्षी आमच्या वर्गात बदलणारे चेहरे, पिकणारे केस, म्हातारपणीच्या सुरकुत्या हे सगळं काही बदल हा एकच शब्द अधोरेखित करणाऱ्या एखाद्या दूता सारखे असतात. सुरवंट चे फुलपाखरू होणं हि तर मला सगळ्यात अदभूत घटना वाटते.  बदल होतोचं फक्त तो समजला की नाही आणि स्वीकारला कि नाही इतकाच प्रश्न.

लहान असताना शाळेत शारीरिक शिक्षण च्या तासाला १५ कृती नंतर प्रकार बदल असं म्हटलं जायचं. घोषात प्रत्येक वाद्याच्या रचनेनंतर घोष दण्डाच्या संकेतानुसार रचना बदलली जायची. शाळेत वर्ग बदलायचे, कपडे किंवा बूट, चप्पल लहान होऊ लागले ते हि बदलत असत. पेन्सिल चं शाई पेन, शाई पेनाचं बॉल पेन, हा हि एक बदलच. अगदी लहान असताना आपल्याला जे आवडायचं ते आज आवडतच असं नाही, विचार करण्याची पद्धत वेळेनुसार बदलत जाते.

काहींचे प्रोजेक्ट बदलतात, काहींच्या नोकऱ्या बदलतात…!

काहींच्या स्टोरी बदलतात, काहींच्या छोकऱ्या बदलतात…!

काहींच्या सवयी बदलतात ,काहींच्या खोड्या बदलतात..!

काहींची घर बदलतात, काहींच्या गाड्या बदलतात…..!

सगळं , सगळं बदलत असतं

कधी पुढं कधी मग जात असतं….! बदल होणारच मग तो forcibly का foreseeably इतकाच काय तो फरक !

स्वातंत्र्यवीर सावरकर एका ठिकाणी म्हणाले होते कि उत्क्रांती शिवाय क्रांती नाही. हे दोन शब्द मी इंग्लिश मध्ये आहे असे शोधण्याचा प्रयत्न केला तर ते निघाले अनुक्रमे evolution आणि revolution , सत्ता बदल होण्या आधी समाजात वैचारिक बदल झाले पाहिजेत असच काहीस आहे ते.

अर्थातच मी दोन्ही बदलांच्या प्रकारांना स्वतंत्र पणे स्पर्श करणारे…कारण खूप मोठा ब्लॉग लिहिला कि वाचक तितका वेळ संयम ठेवत नाही हे एव्हाना मला कळलं आहे. हा ही एक बदलच ‘पिढी’ मधला….! बघा कि पूर्वीची पिढी एकाच बुकात अनेक पेजेस वाचून एकचं विषय समजून घ्यायची आणि आपण अनेक विषय एकाचं फेसबुक पेज वर वाचतो किंवा स्कीम करतो आणि पुढं जातो. हा जसा तंत्रद्यानातला बदल आहे तसा concentration लेव्हल मधला पण बदल आहे.

तर मग भेटूचं “बदल- अपरिहार्यता कि स्विकार्हरता”- भाग-२ आणि भाग ३ मध्ये…!

कथा पांडू आणि बंडू ची भाग-2

(सदरची कथा पूर्ण पणे काल्पनिक असून तिचा कुठल्या हि घटना किंवा व्यक्तीशी संबध आल्यास तो फक्त योगायोग समजावा. लेखक त्याच्या लिखाणाची पूर्ण जबाबदारी घेतोय, पण तुमच्या आकलनाची जबाबदारी तुमची राहील. “कथा पांडू आणि बंडूची भाग-१ “, वाचून हे वाचल्यास विषय सविस्तर कळेल.)

एक आट्पाट नगर होतं. प्राणि म्हणुन न जगता माणुस म्हणुन जगायला शिकणं जेव्हा सुरु झालं असेल त्या वेळच एक समकालीन शहर वजा खेड. इथे आज संध्याकाळच्या वेळी एक पंचायत बसली आहे. कसला तरी एक महत्वाचा प्रश्न सोडवण हा आजचा मुख्य विषय.

मानवी संस्कृतीची चाहुल नुकतीच लागली आणि  सोयीसुविधांच पाऊल हळुहळू पडू लागलं. मग नियम बनू लागले. जगणं अधिकाधिक स्टँडर्ड करायचा प्रयत्न होऊ लागला अश्या आधुनिक युगामधलं हे गाव तस भरलेल,गजबजलेल. साधनं उपयुक्त पध्दतीन वापरता न येणं किंवा तेच शिकण सुरु होत.

आज प्रश्न पाण्याचा होता. गावात दोन खुप मोठ्या विहिरी होत्या. असं कुणी तरी ठरवून दिल होत की एक विहिरीतुन पिण्यासाठी उपसा करायचा आणी दुसर्या मधून इतर कामासाठी. ही दुसरी विहिर जरा जास्त क्षार युक्त तेव्हा पाणी पिण्यास आयोग्य. आता कित्येंक पिढ्या, ह्या एकाच विहिरीमधलं पाणी पीत आल्या होत्या. पण गेल्या ३-४ वर्षा पासुन विहिरी ची पाणी पातळी खालावत निघाली होती. आणी ह्या वर्षी कधी नव्हे इतकी पातळी खालावत गेली ज्यामुळं सर्वत्र भीतीच वातावरण तयार झालं. बरेच पर्याय शोधले गेले, पण चर्चे अंती सर्वमते असं ठरलं की गावापासून बरंच अंतर असणाऱ्या नदी मधून पाणी आणलं जाईल आणि ते विहिरीत टाकलं जाईल. साधनांची कमतरता असल्यानं कुणीतरी बादल्या-बादल्या भरून ते आणलं पाहीजे हे निश्चित झालं. तसेच हे सर्व काम पंचायती ने करावं आणि नागरिकांनी कर द्यावा असं ही ठरलं. आजची बैठक बराच वेळ चालली आणी अगदी सारा गावं जमला होता. तेव्हा तशी ती सविस्तर ही झाली. असंख्य नागरिकांना बरोबर दोन होतकरू, उमदे, चाणाक्ष, धाडसी तरुण ही तिथं उपस्थित होते. दोघे लहान पणा पासून चे मित्र, यार ! एकाच नाव पांडू आणि दुसरा बंडू.

सगळी मिटिंग सपंवुन अनेक लोक अनेक टेक अवेज घेऊन परत निघाले. कुणी निराशा, कुणी चिंता, कुणी प्रश्न मार्गी लागेल अशी आशा, कुणी कुरकुर, पण हि दोघे मात्र काही तरी शोधत होती. त्यांना दिसत होती संधी. कामाची, स्वप्नं पूर्ण करण्याची. एका ठिकाणी दोघेही पोहोचले, अगदी त्यांचा अड्डाच तो. आणि न राहवून पांडू ने विषय काढलाच. चर्चे अंती हे काम करायचं असं ठरलं आणि जोडगोळी कामाला लागली.

दुसऱ्या दिवशी पंचायतीतील लोकांशी भेटी गाठी झाल्या आणि पुढल्या काही दिवसात ह्यांना व इतर दोघा-तिघांना काम मिळालं सुद्धा. पठयाना हुरुप चढला. सकाळी लवकर उठून कामाला जाणं, सूर्य डोक्यावर येण्या आधी काम पूर्ण करणं असा दिनक्रम सुरु झाला. फक्त पैश्या साठी नव्हे पण गावासाठी हि लोक काम करतात अशी धारणा तयार झाली, त्यामुळे गावात मान मिळू लागला. अगदी आयुष्य सेट झाल्या सारखं काहीस फिलिंग निर्माण झालं. रात्री पार्ट्या चालू झाल्या. छान छान कपडे येऊ लागले, जे जे वाट्लं होत ते सगळ सुख ह्यांच्या अपेक्षांच्या विहिरीवर पाणी भरू लागलं.

बघता बघता तीन चार महिने असेच निघून गेले. आणि पांडू कसल्या तरी विचाराने अस्वस्थ झाला. आयुष्य असंच पाणी भरून जाणार का? हा एक साधा पण तितकाच गंभीर प्रश्न पांडू ला स्वस्थ बसू देईना. त्याने आपली अस्वस्थता बंडू ला बोलून दाखवली. पण बंडू एव्हाना एका कंफर्ट झोन मध्ये पोहोचला होता. जे चाललंय ते च छान आहे. हाच आयुष्याचा अर्थ आहे. हे सोडलं तर परत नवीन काय शोधायचं? कशावरून आहे त्या पेक्षा चांगलं काही तरी मिळेल? अश्या बऱ्याच युक्तीवादाने बंडू पांडू ला समजावत असायचा. पण पांडू आयुष्यावर नाराज होता. आपण ह्याच्यासाठी बनलो नाही आहोत हे तो स्वतःला समजावण्यात यशस्वी झाला होता. आणि तो ते बंडू ला ही सांगायचा प्रयत्न होता. एके दिवशी बंडू कडे पार्टी सुरु होती आणि पांडू एकटाच कसल्या तरी विचारात होता. एक कागद पेन घेऊन पांडू काही तरी काम करीत होता. कसलीशी गणित मांडीत होता. बंडू तिकडे गेला आणि नक्की काय चाललं आहे ते त्यानं बघितलं. पांडू ने त्याला एक सविस्तर योजना सांगितली. आणि पांडू ने बंडूला त्याच मत विचारलं. बंडू थोडासा गोंधळला होता. त्याने दुसऱ्या दिवशी सांगतो असं सांगितलं.

भल्या पहाटे पांडू प्रचंड अपेक्षा घेऊन बंडू कडे गेला. तिथून दोघेही कामाला जायला निघाले. खूप वेळ वाट बघून न राहावुन पांडू न विषय छेडला पण बंडू दिवसभर तो विषय टाळत राहीला. दोन दिवस गेले, तीन दिवस गेले,तरीही बंडूचा काहीच रिप्लाय नाही. सरते शेवटी एक आठवड्याने बंडूने पांडूला सांगितलं कि “मला तू म्हणतो आहेस त्यात गट फिलिंग नाहीय. मला नकोय इंसेक्युरिटी. मला रिस्क नकोय. आणि कृपया परत हा विषय पण नको.”

पांडू, थोडा निराश झाला, हताश झाला पण त्यानं ठरवल होतं. त्याला भविष्य दिसत होत. तो, जे बघू शकतं होता ते कुणालाच दिसत नव्हतं. बंडूला कळतं होत पण वळतं नव्हतं. आणि बंडू जिथं स्वतःवर विश्वास ठेऊ शकत नव्हता तिथं तो पांडू वर विश्वास काय ठेवणार? पांडूचा मात्र निर्धार झाला होता. काहीच दिवसात तो फक्त निम्मं काम करू लागला. मधूनच कामावरून गायब होऊ लागला. रात्रीच्या पार्ट्या बंद झाल्या. मित्र परिवारातला वावर कमी झाला. तो एकटा होता. हातात कसलीशी कागद अवजारं घेऊन तो फिरायचा. कामावर कमी काम केल्यानं त्याला पैसे कमी मिळू लागले. लोक खुळ्यात काढू लागली. माघारी काय वाट्टेल ते बोलू लागली. अवहेलना, थट्टा, कुचेष्टा हे सगळं त्याच्या वाट्याला येऊ लागलं. पण पांडू साठी तो साक्षात्काराचा काळ होता. ” एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले……”, अशीच पांडूची अवस्था होती. जग काय बोलतं ह्या पेक्षा पांडुच लक्ष त्याच्या ध्येया वर होतं. अनंत अडचणी पार करून तो एकटा पुढं निघाला होता. कारण पुढं जाणं आणि ध्येयं गाठणं ह्यातला फरक त्याला कळाला होता.

साधरणतः सहा आठ महिन्याचा तो काळ, एकदा दोनदा पैसे कमी पडले म्हणून तो बंडू कडून तो घेऊन ही गेला. बंडू ही पांडूच्या काळजीत होता. पण आता कंटाळू लागला होता. तेच तेच करून त्याला ही उबग येऊ लागला होता. एकी कडे त्याला पांडू ची धडपड दिसत होती. तर दुसरी कडे त्यांच्या सारखे काम करणारे इतर लोकं ही होते जे पांडूची चेष्टा करत होते. बंडू अजूनही त्याचं सेक्युर आयुष्यात मग्न होता. तितक्यातच पांडू ने पंचायतीत जाऊन तो हे पाणी भरायचं काम सोडतो आहे असं सांगितलं. बंडू अवाक झाला. पांडू ची चेष्टा करणारे लोकं त्याला वेडा ठरवून मोकळे झाले. बंडू ला हे कळता क्षणीच त्याने पांडू कडे धाव घेतली आणि हे काय आहे जाणून घेण्याची ईच्छा व्यक्त केली. पांडू म्हणाला फक्त चार दिवस थांब. सगळं कळेल.

तिसऱ्या दिवशीच गावात एक जाहीर निमंत्रण दिल जाऊ लागलं. गावातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये कसलासा कार्यक्रम होणार असल्याची दंवडी पिटवली जात होती. निमंत्रण पत्रिका वाटल्या जात होत्या. हे सगळं होतं पांडूच्या पाणी वाहून नेणाऱ्या पाईप लाईनच उदघाटन. सोहळ्याचा दिवस उजाडला संपूर्ण पंचक्रोशीन पांडू ची वाहवा केली. आणि आता हि पाइपलीन इतरांच्या तुलनेत दसपट पाणी वाहून नेऊ लागली. पांडूचे दिवस अचानक पालटले. जितके महिने पांडू कमी पैश्यावर जगत होता ते सगळं अगदी एका महिन्यात भरून निघालं होत.

पांडूला खुळ्यात काढणारे एव्हाना कुठे दिसेनासे झाले होते. काहींनी सपशेल शरणागती पत्करली आणि पांडूने आपल्याला विचारूनच हे सगळं केलं अशी सांगायला सुरुवात केली होती. पांडू आनंदी होता कारण त्यानं फक्त एक पाणी वाहून नेणारी पाईपलाईन बांधली नव्हती. तो भविष्यातील यशाचा राजमार्ग होता. पांडू कड बघून खूप लोक तस करायचा विचार करू लागले पण आता पांडू इतरांच्या खूप पुढं होता. त्याची मैत्री आता कष्ट, अवहेलना, संघर्ष ह्यांच्याशी झाली होती. त्यांची खूप मदत झाल्यानं पांडू तावून सुलाखून निघाला होता. अनुभव नावाच्या गुरुन पांडूला समृद्ध केलं होत. त्यामुळं पांडूला स्पर्धेची भीती उरली नव्हती की अपयशी होण्याचा विचार त्याच्या आसपासही फिरकत नव्हता.

आज पांडू कडे पार्टी होती आणि बंडू निमंत्रित होता. पुन्हा एकदा पांडू एक कागद घेऊन बंडू कडे आला आणि कसलीशी एक योजना बंडूला सांगू लागला. ह्या वेळी बंडू अधिक जबाबदारीनं ते ऐकत होता.

पुढं पांडू आणि बंडू च काय झालं ते ऐकायला आपल्याला थोडं थांबावं लागेल वाट बघावी लागेल.

मी आधीच सांगितल्या गत प्रश्न पडेल आणि प्रत्येकाला म्हणावं वाटेल “मी आहे पांडू आणि बंडू कोण? तुचं…..! तुचं …… !

पण हि फक्त कथा आहे तुमची माझी व्यथा नाही.

कारण पांडू स्वयंभू असतात सूर्या सारखे आणि बंडू चंद्रा सारखे सूर्याचा उजेड परावर्तित करणारे. पण दोघांनाही तितकंच महत्व आहे आणि असेलं. पण बाकीच्यांना अस्तित्व नव्हतं आणि नसेल. कारण गर्दीत फक्त माणसं असतात चेहरे किंवा ओळख नाही.

कथा पांडू आणि बंडू ची – भाग -१

आपलया कडे कथा कथन हे नेहमीच एक प्रभावी माध्यम म्हणून वापरलं गेलं. किर्तनकार, प्रवचनकार ह्या मंडळी तर हक्का ने कथा सांगतात. पु. लं. चे हरी तात्या हे काय एकटेच पुराव्याने सांगत नाहीत. असे अनेक हरी तात्या आज कार्पोरेट क्षेत्रात कथा सांगून करोडो रुपये मिळवतात. फक्त तिथे त्याला स्टोरी टेलिंग असं आधुनिक नावं दिलं गेलं. शिळ्या कढीला ऊत आणताना नवीन पॅकेजिंग केलं की आपल्या कडे जनता खुळी होतेच.

बरं आम्ही आपले पडलो संघ वाले, संघात बौद्धिक हा एक फार महत्त्वाचा असा सोहळा. हो सोहळाचं ! कारण ती एक संधी असते आपल्या पेक्षा जास्त अनुभव आणि कर्तृत्व असलेल्या सुयोग्य माणसाला ऐकण्याची. अगदी सर्वोत्तम करंट फ्लो होतो तिथं, कारण बौद्धिक घेणारा माणूस हा नक्कीच ऐकणाऱ्यांपेक्षा जास्त पोट्यानशिअल ला असतो. झालं कि मग ‘हाय’ टू ‘लो’ विद्युतधारा चालू. मग त्यात कथा, संदर्भ ,इतिहास, भूगोल ठासून भरलेला असायचा. तिथं ऐकलेल्या कथा आयुष्यभर साथ देत राहतात. ‘अजयराव तेलंग’ Ajay Telang म्हणजे तर चालतं बोलतं विकिपीडिया. युपीएसीचा अभ्यास करणारा, जर अजयरावां बरोबर राहीला तर १०-१२ वेळा अधिकारी होईल इतकं अगाध ज्ञानभांडार . त्यांचाही भर कथा कथना वर जास्त.

अपसूक च मला त्याची सवय लागली. आपला श्रोता कोण? त्याच्याशी रेपो कसा तयार करायचा? हा प्रत्येक शिक्षकाला भेडसावणारा प्रश्न. त्यात न आवडणारा, कमी यश मिळणारा विषय अधिक सोपा करून सांगायचं म्हणजे अजून अवघडं. ह्याला एकच ऊपाय ! विद्यार्थ्यांवर प्रभाव पाहिजे. त्यांच्या मनावर राज्य करत असतानाचाच, त्यांच्या बुद्धीला गारुड घालता आलं पाहिजे. मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवताना हेच केलं. आणि त्यासाठी कथा कथन हे एक प्रमुख साधन मी वापरलं, वापरतोय.

वाचन व्यापून टाकलेले पु.ल, आणि आयुष्य व्यापुन टाकलेला संघ ह्या दोघाना त्याच श्रेय.

आज कथा कथन विदयार्थी सोडून इतरांसाठी सुद्धा करावं वाटलं. अर्थात त्याला तसं कारण ही आहे आणि हीच ती अचूक वेळ ही आहे.

मला नेहमीच वाटतं , “प्रगतीचा वेग हळू असला तरी तो दृश्य पाहिजे” ,कारण प्रत्येकालाच पुढं जाण आणि ध्येय गाठणं ह्यातला फरक कळतो असं नाही.

बऱ्याच वेळेला काही जण जे बघू शकतात ते इतरांना दिसतच असं नसतं. काळाच्या पुढं पाहणं हा काही प्रत्येकाला लाभलेला गुण नसतो. जे काळाच्या पुढचं बघू शकतात, त्यांच्या विचारांचा वेग अर्थातच इतरांपेक्षा जास्त, विचार मांडण्याची त्यांची शैली इतरांपेक्षा अधिक आक्रमक, आणि कामाचा आवाका खूप मोठा असतो. अशी लोक हांतुरणात पाय बसतात का नाही, ह्याच्या मागे न लागता, स्वतःच्या हांतरूणाचा आकार वाढवण्यासाठी कटीबद्ध असतात. आपली स्वप्नं एकदा आपल्या अडचणीं पेक्षा मोठी झाली की मग आपसूकच कार्यक्षेत्राच्या सीमा , समस्यांना तोंड देण्याची इच्छाशक्ती आणि संघर्ष करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता विस्तारत जाते. अशी माणसं हा नेहमीच चेष्टेचा विषय असतात. अवहेलना हि त्यांच्यामागे सावली प्रमाणे लागलेली असते. त्याच्या माघारी त्यांना नावं ठेवणं, ते कसे चूक आहेत, ते कसे फसवे आणि खोटारडे आहेत, ते जे सांगतायत ते कसं दिवास्वप्नं आहे, हे सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न होत असतो. ते कसं मोठं मोठं बोलतात ह्या कडे लक्ष वेधलं जात असतं. एकंदरीतच भौतिकशास्त्रातलं घर्षण इथं मानवी असुयेच्या कोइफिशन्ट सकट आलेलं असतं.

मग बरेंच तरुण/तरुणी ह्या घर्षणाला बळी पडतात. “साध्यं”, टप्प्यात आलेलं असताना काही जण परावृत्त होतात. लोक काय म्हणतात ह्या पेक्षा आपल्याला काय वाटतं त्याला महत्व द्यावं कि नाही ? सगळ्यांना डावलून पुढं गेलो ही आणि अपयशी झालो तर..? एक प्रश्न, पडला की मग, मागून एक प्रशपत्रिकाचं आपल्या समोर येऊ लागते.

मग येतो शेवटचा टप्पा जिथं, प्रश्नाची जागा समस्येंन घेतलेली असते. समस्या असते “मीच का?” आणि इथंच त्यांचा परमेश्वर त्यांची सगळ्यात कठीण परीक्षा घेत असतो. पु.लं. एका पत्रात त्यांच्या स्नेह्याला मृत्यू बद्दल लिहितात की जेव्हा जगणं जस्टिफायेबल होईल तेव्हाच मृत्यू ला जाब विचाराता येईल. अगदी तसेच बरच चांगलं काही नियती आपल्याला देत असते तेव्हा आपण हेच “मीच का” विसरतो. आणि आठवतं संघर्ष्याच्या वेळी.

“मीच का??” कारण तू पुढचं बघू शकतोयस किंवा वेगळा विचार करू शकतोयस म्हणून. तूच…

सदरची कथा अश्या अनंत तरुणांसाठी माझ्या कडून भेट. कुणी ती आधी वाचली असेल. कदाचित मसुदा तोच पण आशय वेगळा असेल.

थेट कथे कडे जाण्या आधी थोडं हे कोडं अधिक समजून घेऊया.

दोष नक्की कुणाचा असतो? काळापुढचं बघू पाहणाऱ्यांच की न बघू पाहणाऱ्यांच ? चुकतं कोण असतं, स्वतःचं हांथरुण मोठं करायचा विचार करणाऱ्यांच की पाय पोटात घेऊन आहे त्यात भगवणाऱ्यांच? वेळ फुकट कोण घालवत असतं. आपले विचार समजण्याची क्षमता ज्यांच्या कडे नसते त्यांना ती समजून सांगणाऱ्याच की ते विचार कसे चूक आहेत हे सिद्ध करायची जिद्द करत असलेल्यांच?

हा संघर्ष अनादी कालापासून चालत आलेला आहे आणि चालत राहणार. समाजाच्या नाण्याच्या ह्या दोन बाजू असतात. त्या दोन भिन्न प्रवृत्ती एकाच वेळी समाजाचा गाडा समतोल करीत असतात. फक्त जो पुढचं बघू शकतो त्यानं खूप सावध असण गरजेचं असतं. कारण पुढचं न दिसणाऱ्याचा काहीच दॊष नसतो. ज्याला दिसून ही तो काही करू शकत नाही तो मात्र गुन्हेगार ठरतो.

मराठीत एक खूप छान गाणं आहे. ” एका तळ्यात होती बदके पिले सुरेख…. “. त्याचं शेवटचं कडवं खूप अप्रतिम आहे.
” एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले,
भय वेड पार त्याचे वार्यासवे पळाले,
पाण्यात पाहताना चोरूनी या क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक “.

“साक्षात्कार ” हा शब्द योग्य आहे ह्याला. सदरचा साक्षात्कार सगळ्यांना झाल्या गत वाटू शकतो. तो पुन्हा पुन्हा पडताळला पाहिजे. “इल्युजन” , स्वतः बद्दल फाजील आत्मविश्वास नाहीय ना ह्याची चाचपणी करून मगच पुढं सरकलेलं कधीही चांगलं. आपल्या ध्येया पासून विचलित न होणं. सोप्या मार्गानं पटकन यश मिळावं असं न वाटणं. प्रलोभन, मोठेपणा ह्या पासून दूर राहणं . अश्या एक ना अनेक नैतिक जबाबदाऱ्या ह्या साक्षात्कार्यावर लादल्या जाणार असतात.

माझी कथा ह्याच दोन प्रवृत्तीच दर्शन घडवते. अर्थात ती माझी नाहीय. पहिल्यांदा मला ती Omkar Kulkarni ने सांगीतली. मग पुन्हा ती माझ्या वाचनात आली. मी फक्त वाहक. सेवेची ठायी तत्पर.

आता कथा म्हटलं की पात्र आली, मग त्यात तुलना आली. इथेच माझ्या मदतीला अशोक मामा आले. “अशोक सराफ”. ते नाही का “कळतं नकळतं” सिनेमात त्यांच्या भाचा आणि भाच्ची ला पटवताना एक गाणं गातायत. हा करेक्ट “नाकावरच्या रागाला औषध काय?”…. त्याच गाण्याचं शेवटचं कडवं म्हणजे आमची दोन पात्र….. ते नाही का म्हणतं आहेत.

” मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची !
पांडूची , बंडूची ,पांडू आणि बंडूची ….
पांडू आणि बंडू दोन होती मुलं.
एक होत शहाणं एक होत खूळ..
पांडू होता हुशार बंडू होता मठ्ठ ….
पांडू ऐके आईच बंडू करी हट्ट….
पांडू होत्या पठ्ठया बंडू होता रड्या
पांडू खाई पेढे बंडू खाई छड्या
पांडू होता गुणी बंडू होता हूच ….
मी आहे पांडू आणि बंडू कोण ??
तूच तूच… ”

जेव्हा आपली कथा संपेल तेव्हा एकमेकांकडे बोटं करुन , तूच म्हणावं वाटेल पण म्हणू नका. कारण फक्त हि कथा आहे. तुमची, माझी आपल्या समाजाची व्यथा नाही.

तर मग भेटू भाग-२ मध्ये !

अनुभवाचं वय

एक महत्वाची मिटींग संपवून मी आणि गुरूदत्त बाहेर पडत होतो. तिथले एक अतिशय परिपक्व (अनुभवी)गृहस्थ,जे तिथले सहप्रमुख आहेत ते आमच्या सोबत आले होते. कदचित आम्हाला निरोप देण्याची औपचारिकता करायची असेल त्याना. सहज काही तरी विषय निघाला आणी आमच्या पदवीधर होण्याच वर्ष त्याना कळल. ते पट्कन उद्गारले “तुमच वय इतकंच आहे…!”

आम्ही तिथून निघालो. खुप दिवस ही मध्ये निघुन गेले. पण ते वाक्य मनात घोळत राहील. त्याना आमचं कौतुक करायच असेल ही कदाचीत पण मला ते खटकल होतं. वय आणि कर्तुत्व ह्यांचा कहीच संबध नसतो ह्याची कित्येक उदाहरण आपल्या समाजात असुनही अजून आपण किती मागास आहोत ह्याच एक ज्वलंत उदाहरण मी अनुभवलं होत.

अवघी विशी ओलांडण्या आधी निजामशाही,अदिलशाही ला फेस आणणारे आमचे शिवाजी महाराज. वयांन बरोबर अर्धे असुन ही निजमाला नामोहरम करणारे पेशवे बाजीराव. पुढ मंगल पांडे ,नानासाहेब पेशवे, सावरकर,भगतसिंग आणी लाखो लोकानी कर्तुत्वाचा आणि वयाचा काही संबध नसतो हे दाखवून दिल आहे.

तरिहि आज आपल्या आजुबाजुला अनेक आदित्य पांचोली दिसतात. तो नाही का बाजीराव सिनेमात म्हणाला होता, “चंदन के पेड को भी सुगंध देने मै एक उम्र लगती है !”😏

पण पुढच उत्तर ही उत्तम होत. “पर काटा छोटा हो तभ भी चुभता है !काय म्हणता?”😀

भारतात कधीच बिल गेट्स,स्टीव्ह जॉब्ज, मार्क झुकरबर्ग आढळतं नाहीत. इथं कधीच गूगल,फेसबुक किंवा वॉलमार्ट सारख्या अस्सल किंवा मुळ संकल्पना जन्म घेत नाहीत. रेल्वे काय किंवा मैट्रो काय आम्ही दुसर्या कडून घेतो. जीवनपयोगी वस्तू चीन कडून.आमच्या इथे मर्सिडीज नाही ओडि नाही,सगळं बाहेर आहे.

पण इथुन तिकडे “टाटा” जातात काय आणी लैंड रोवर घेतात काय? आमचा सत्या किंवा सुंदरतिकडे जातात काय आणि तिथले प्रमुख होतात काय? हे सगळं समीकरणच थोडं गुढ आहे.पण तिथल्या सामाजिक जडणघडणी मधे काही तरी वैशिष्ट्य असेल अस नक्की वाटत.

मला असं वाटत व्यक्ती आणि समाज हे खुप एकरूप असतात. ऊत्तम समाज जसा सर्वोत्तम व्यक्तीनी घडतो तसच पुरुषोत्तम व्यक्तिमत्व प्रगल्भ समाजा मुळ घडतं.

राष्ट्र उन्न्तिचा मार्ग व्यक्ती निर्मणा कडून समाज उभारणी च्या मार्गाने जातो हेच संघ कित्येंक वर्ष सांगतोय,करतोय.

पण मग मी विचार केला की कमी वयात ही यश मिळत हे खर, मग हे कस घडतं?

तेव्हा लक्षात येत की तूम्हाला जेव्हा एक्सपोजर मिळत किंवा तुम्ही ते मिळवता. सतत काम करत राहता,ते करता ना चुकता,त्यातुन शिकता. नविन माणसाना भेटता. ती माणस पुस्तकं वाचल्या गत वाचुन काढता. अपमान पाण्याच्या घोटा बरोबर पिऊन टाकता आणी रक्ताचा घाम करुन काम करत राहता. गोष्टी ओब्सर्व करता. कान आणि डोळ्या बरोबर मनाची आणि बूद्धिची दार सताड उघडी ठेवता. तेव्हा तुमच मोजल जाणार वय भले एक वर्षानी वाढेल पण तुमच्या प्रगतीच आणी प्रगल्भतेच वय प्रत्येक क्षण, प्रसंग,समस्या आणी संकटा गणिक वाढलेल असत.

70 वर्षे होऊनही आयुष्यच तत्वद्यान दासबोधात शोधणार्या आजोबा पेक्षा 17 व्या एव्हरेस्ट सर करणारयला दासबोध न वाचता ही समर्थ कळतात हेच खर गमक आहे.

हे समाज रुपी पुरुषा इथं च तर खरी मेख आहे.
“कुणी ह्या तुफानला अनुभव देत का रे अनुभव”.

कुणीही देणारं नाही.

कारण अनुभव आणि अनुभुति ह्याला वय नसत,वेळकाळ नसते. कसल मोजमप नसत. कसलेही मापदंड नसतात.

अनुभव विकत मिळत नाही, फुकट ही मिळत नाही.

तुमची दोन वय असतात. एक शरीराच दुसर अनुभवाच. पहील निसर्गदत्त देणगी दुसर स्वकर्माची ठेव. सतत अव्याहत व्याज देणारी.

पुढल्या वेळी ते सद्गृहस्थ भेटले की आमचं दुसर वय त्याना सांगतो.

आपल्या घरी निघालेल्या बाप्पा ला एकच मागणी$$

“प्रतिभेला कमतरता नसणार्या आमच्या समजाला प्रगल्भता दे रे महाराजा…..”

“फेसबुक वरून तरी जात पात नष्ट करू……!!!”मध्यन्तरी मला एक मेसेज आला. 

फेसबुक वर ना का बदललं ?
फक्त प्रसन्न संजीव हे काय नविन ??

मला वाटत उत्तर देण्याची वेळ आलीय.  वि वा शिरवाडकरांची एक छान कविता आहे. लढवय्या मराठयां साठी !!! कवितेचं नाव आहे ” निर्धार” . 
त्यांना अपेक्षित असलेला मराठा म्हणजे छत्रपतींचा प्रत्येक मावळा आहे. मृत्यू समोर असून ही प्रति शिवाजी म्हणून शत्रू कडे गेलेला शिवा काशीद हा शत्रू साठी मराठा होता. बारा बंदी रक्तानं भरलेली असताना माझा राजा गडावर पोहचे पर्यंत मी जीव सोडणार नाही म्हणणारा बाजी प्रभू शत्रू साठी मराठा होता. मदारी मेहतर शत्रू साठी मराठा होता. कवी कलश शत्रू साठी मराठा होता. दिल्लीला भीती घालणारा बाजीराव उत्तरेत मराठा होता. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारा दत्ताजी मराठा होता. पानिपतात अब्दालीला घाम फोडणारा प्रत्येक मावळा अब्दाली साठी मराठा होता. (लक्षात घ्या पानिपत नंतर एकही हल्ला वायव्येतून झाला नाही पण दहाच वर्षात सयाजी  शिंदे दिल्ली चालवत होते.) )
१९६१ साली , मा. यशवंत राव जेव्हा युद्ध भूमीवर पोहोचले तेव्हा हर हर महादेव ची घोषणा देणारा प्रत्येक जवान मराठा होता. अश्या ह्या मावळ्यांचं वर्णन करणारी हि कविता. 
समर भूमीचे सनदी मालक शत युधांचे मानकरी 
रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी  घोरपडीला दोर लाउनी पहाड दुर्घट चढलेले 

तुटून पडता मस्तक खाली धुंद धडा ने लढलेले 

खंद्कातल्या आंगारावर हासत खेळत पडलेले 

बाप असे कळी काळ ज्यांचा कीर्त गाजली दिगंतरी !!रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी……. 

सन १६४५: छत्रपती शिवाजी, स्वराज्य स्थपनेचा संकल्प !!  पुढला सगळा सुवर्ण इतिहास

सन १८५७, मंगल पांडे शाहिद : क्रांती : सम्पूर्ण देश एकजूट 

सन १९०० च्या अलीकडं पलीकडं दोन आघाड्यां वर लढा,  नंबर एक ब्रिटिश , नंबर दोन वर्णभेद. 
ह्या जाती पातीच्या लढ्यात नेतृत्व केलं महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, छत्रपती शाहू महाराज, पूजनीय डॉ. बाबा साहेब आंबेडकर , स्वा.सावरकर. 
देश स्वतंत्र झाला, १९४८ साली पहिला भडका उडाला जाळपोळीच्या निमित्त्यानं आणि गेल्या शतकांत ह्या सगळ्या लोकांनी मिळून जे एकजूट करण्याचा प्रयत्न केला त्याची अदोगती सुरु झाली. इतकंच होत ह्या वेळी  रेषा ऋणा कडे न जाता उलटी कडे निघाली होती. 
आम्ही ह्या जातीचे आम्ही त्या आमच्यात असं तुमच्यात तसं ! अरे तू बामनाचा ना मग मटण खातोस….. ते मराठे लई तापट असतात ….. आणि खूप काही  कशा साठी माहित नाही?? 
आणि ह्या नाजूक काळात नेतृत्व कोना कडे हे आता लिहायची गरज नाही. त्यात परीपाक  झाला जेव्हा बी ग्रेड आणि सी  ग्रेड स्वतःच्या सडक्या बुद्धीनं थर्ड ग्रेड लिखाण चालू केलं. ते थांबलंय असं नाहीय, पण थांबेल. आपलंच बाळ आपल्या मांडीवर हगल्यावर मांडी कापू नये, बाळाला संडास करायला योग्य जागा दाखवावी. 
इतकंच म्हणणं आहे आपण आपल्या प्रतिभेला प्रगल्भतेची जोड दिली पाहिजे. जात पात विसरून देश म्हणून पुढं आलं  पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण समाज म्हणून एकत्र आलोय तेव्हा आपण काही तरी अद्वितीय केलंय. वेळ आलीय पुन्हा एकत्र होण्याची , आपल्या नेतृत्वाला आपल्या सजगतेच्या जाणीव करून देण्याची. वि. वा. त्याच कवितेंत शेवटी म्हणत आहेत. 

भरत भूमीचा वत्सल पालक देव मुनींचा पर्वत तो   (हिमालयाचं वर्णन आहे)

रक्त दाबुनी उरात आम्हा आर्त  स्वराने पुकारतो 

हे सह्या चल हे सातपुडा शब्द अंतरा  विदारतो 

त्या रक्ताची त्या शब्दाची शपथ आपल्या जळे उरी !!रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी !!

वास्तवात जात विरहित समाज तयार व्हायला वेळ लागेल , लागूदे तो देऊया ही… 
पण निदान सोशल मीडिया आणि इतर ठिकाणी तरी ती सोडायचा प्रयत्न करूया. फक्त आपलं नाव बदलल्या मूळ बदल होणार असेल तर चला करूया !!!!
शिवाजीचं धर्म व्हावा शिवाजीचं जात,
शिवाजीचं कर्म आणि शिवाजीचं बात !
शिवबाचं आमुचा मंत्र व्हावा, शिवबाचं आमुचे तंत्र 
शिवशाही अमुचा ध्यास आणि स्वराज्यच आमुचे गोत्रं !

Where are the engineers?

Where are the engineers?: http://m.thehindu.com/opinion/op-ed/where-are-the-engineers/article7322623.ece

Posted from WordPress for Android

“मृगजळाचा पाठलाग”.

आज सकाळ तशी कंटाळा घेऊनच आली . गच्च भरलेलं आभाळ , बोचरी थंडी, आणि मनात विचारांच काहुर. पाऊस जरी आज अनाहूत असला तरी, मनातील विचारांचे धग दोन तीन दिवसांन पासुन जमत होते.  १२ वी चा निकाल हे त्याच प्रमुख कारण, सोबत पालक ह्या प्रजातीच अज्ञान,  उतावळेपण, विद्यार्थ्यांचं प्रचंड गोंधळ, क्लासेस च निर्ल्लज मार्केटिंग आणि सर्वात मोठा परिपाक म्हणजे मुलांना दाखवला जाणारा चुकीच्या, अवाजवी अपेक्षा आणि त्यातुन सुरु होणारा “मृगजळाचा पाठलाग”.

गेली चार वर्षे मी हे सगळं एक शिक्षक म्हणून बघतोय. हल्ली मला ह्या पालकांची अवस्था पूर्ण टक्कल पडूनही ते लपण्यासाठी टोपी घालुन फिरणाऱ्या एखाद्या मध्यमवयीन गृह्स्तागत वाटू लागलीय. “मुल देवाघरची फुलं ” ह्यातलं फुल हे इंग्रजी आशयान येत असाव अशी खात्रीच पटू लागलीय.  अच्छे दिन वाल शासन आमच्या गोत्राच(ब्रिगेडला अभिप्रेत असलेल हे गोत्र नव्हे, स्वयं-सेवक परंपरेला आधारभूत असणार गोत्र )असल्यान काहि तरी बदल करतील आशी आपेक्षा ह्या वर्षी तरी पूर्ण होताना दिसत नाहीय. काहि मुद्दे विचार करण्यासारखे वाटू लागलेत:

१) शिक्षणाचा मूळ हेतू काय?

२) शिक्षण पद्धती आणि संस्था ह्यांना पोखरणाऱ्या वाळवीच काय?

३) शिक्षण ही औपचारिकता आहे की आवश्यकता?

४) शिक्षण देणारे शिक्षक आणि शैक्षणिक संस्था ह्यांच्या दर्जाच काय?

५) शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच काय?

६) स्किल बेसड एजुकेशन च ठीक आहे. पण स्कील्लिंग च्या विल्लीग्च काय?

प्रतिभेला कमतरता नसलेल्या आमच्या ह्या देशात प्रगल्भता हरवून गेलीय असच वाटू लागल आहे. ओंगळवाणी पुस्तकं असोत , त्रोटक आणि पूर्व ग्रह दुषित मनानं तयार झालेला अभ्यासक्रम असो , मग पाचवी ते नववी पर्यंत हर एक प्रमाणपत्र इच्छुकाला ते देण्याची शासकीय योजना असो  सगळीकडेच “सर्व शिक्षा अभियान”  आपला प्रभाव दाखवत आहे. अशा “सर्व भिक्षा अभियानाच” मुळ शोधलं तर ते भरमसाट झालेली कॉलेज आणी त्यावरून तयार झालेलं आर्थिक समीकरण च असेल आस वाटू लागतं. हे सगळ एक प्रकारे ३६५ दिवस चालणार एजुकेशन प्रीमियर लीग च म्हणावं लागेल. इथं ही सगळ ठरलेलं असतं, डोनेशनच रेट, परिक्षेचे डेट (निदान महिना), ओरल चे मार्क आणि सगळ्यात महत्वाचं कितीही अपयशी  असलं तरी काही वर्षानी पदवीधर झाल्याच प्रमाणपत्र. अगदी जात्यात धान्य टाकून जात फिरवलं की कस धान्य बाहेर येणारच तसचं.

दिवसें दिवस दर्जा घसरत चालला आहे, ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे शासनाने कमी केलेला पात्रतेचा निकष. १२ वी नंतर अभियांत्रिकीला जाण्याचा पात्रता निकष सतत कमी केला गेलाय,त्यात भर म्हणून केमिस्ट्री ने पात्र होत नसेल तर वोकेशनल विषयाचे मार्क गृहीत धरून पात्र केल जातय.

हल्ली मुलांमध्ये फक्त पात्र होण्याचे उद्दात्त ध्येय दिसून येते. काहीही झालं तरी प्रवेश निश्चितच असतो. मग हे गुढग्याला बाशींग बांधलेले अभियंता प्याकेजच्या गप्पा मारताना बघून मला उंटाच्या ढुंगणाचा मुका घेण्याचा प्रयत्न करणार्या पंचतंत्रातील पात्राची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

ह्या वर्षीचा निकाल ही खूप धोक्याची घंटा आहे.  मनोरंजन किंवा करमणूक म्हणून समोर आलेला तो एक App  स्वतःचे अदृश्य, अनाकलनीय आणि दूरगामी परिणाम ह्या वर्षी दाखवू लागलाय. १० वी ला भरमसाट मार्क पडलेले आमचे बरेच वीर आत्ता पत्त्यासारखे कोसळले आहेत.   मग  ते कोणत्या  कारणामुळे हा खरा प्रश्न आहे. ह्याचा अर्थ एक तर आधी दिलेले मार्क खोटे होते किंवा आत्ता ते दुर्लक्ष करत होते.  बरं विद्यार्थी ठिक आहे काही  शिक्षक जेव्हा मी बघितले जे “जेइइ” रद्द झाली म्हणून आनंद व्यक्त करत होते. त्यांची तर मला कीव येते . क्लास घेण हा तुमचा व्यवसाय असू शकतो पण तो  मन लावुन केला गेला पाहिजे. वासरात लंगडी गाय शहाणी आसा नाही.

असं म्हणतात की एका पिढीन दुसऱ्या पिढी चांगल काही तरी द्यावं. मला नाही वाटत आपण मागे चांगल काही  तरी ठेवतोय. मी शोधतोय, तुम्हाला सापडलं तर मला ही सांगा. “पालक “नावाची भाजी आणि माणस हल्ली मला तरी नकोशी झाली आहेत. काहि च वर्षात वाढत जाउन साताऱ्या  ला येउन पोहोचणाऱ्या  पुणाच्या गर्दीत  मिसळून टाकण्यासाठी जे मुलांना शिकवतात अश्या एका  जरी पालकान हा लेख वाचला तरी मला फोन करा “निद्रीस्त झालेल्या भावना आणि प्रगल्भता जागृत करण्यात मला  तुमची मदत हवीय .

आपला,

प्रसन्न संजीव जोशी.

९८२०२७२०४७

Opportunistic Hiring

Worth Reading

David Cummings on Startups

One of the most important responsibilities for an entrepreneur is recruiting great people. Only, most entrepreneurs exclusively focus on recruiting people for open positions (e.g. ones that have a job listing on the site). Instead, entrepreneurs would do well about being more proactive with opportunistic hires. Yes, financial considerations are incredibly important, but so is getting the best people possible, even if the order of hiring differs from the current plan.

Here are a few thoughts on opportunistic hiring:

  • Let team members know that the company is open to opportunistic hiring (most people don’t even consider it yet referrals from employees are often the best candidates)
  • Hold the potential opportunistic hires to an even higher standard, and ensure that they’re great culture fits
  • Evaluate how bringing on an opportunistic hire now affects the hiring plan and communicate how it would change things to team members
  • If the timing doesn’t work, let the candidate know…

View original post 63 more words