अनुभवाचं वय

एक महत्वाची मिटींग संपवून मी आणि गुरूदत्त बाहेर पडत होतो. तिथले एक अतिशय परिपक्व (अनुभवी)गृहस्थ,जे तिथले सहप्रमुख आहेत ते आमच्या सोबत आले होते. कदचित आम्हाला निरोप देण्याची औपचारिकता करायची असेल त्याना. सहज काही तरी विषय निघाला आणी आमच्या पदवीधर होण्याच वर्ष त्याना कळल. ते पट्कन उद्गारले “तुमच वय इतकंच आहे…!”

आम्ही तिथून निघालो. खुप दिवस ही मध्ये निघुन गेले. पण ते वाक्य मनात घोळत राहील. त्याना आमचं कौतुक करायच असेल ही कदाचीत पण मला ते खटकल होतं. वय आणि कर्तुत्व ह्यांचा कहीच संबध नसतो ह्याची कित्येक उदाहरण आपल्या समाजात असुनही अजून आपण किती मागास आहोत ह्याच एक ज्वलंत उदाहरण मी अनुभवलं होत.

अवघी विशी ओलांडण्या आधी निजामशाही,अदिलशाही ला फेस आणणारे आमचे शिवाजी महाराज. वयांन बरोबर अर्धे असुन ही निजमाला नामोहरम करणारे पेशवे बाजीराव. पुढ मंगल पांडे ,नानासाहेब पेशवे, सावरकर,भगतसिंग आणी लाखो लोकानी कर्तुत्वाचा आणि वयाचा काही संबध नसतो हे दाखवून दिल आहे.

तरिहि आज आपल्या आजुबाजुला अनेक आदित्य पांचोली दिसतात. तो नाही का बाजीराव सिनेमात म्हणाला होता, “चंदन के पेड को भी सुगंध देने मै एक उम्र लगती है !”😏

पण पुढच उत्तर ही उत्तम होत. “पर काटा छोटा हो तभ भी चुभता है !काय म्हणता?”😀

भारतात कधीच बिल गेट्स,स्टीव्ह जॉब्ज, मार्क झुकरबर्ग आढळतं नाहीत. इथं कधीच गूगल,फेसबुक किंवा वॉलमार्ट सारख्या अस्सल किंवा मुळ संकल्पना जन्म घेत नाहीत. रेल्वे काय किंवा मैट्रो काय आम्ही दुसर्या कडून घेतो. जीवनपयोगी वस्तू चीन कडून.आमच्या इथे मर्सिडीज नाही ओडि नाही,सगळं बाहेर आहे.

पण इथुन तिकडे “टाटा” जातात काय आणी लैंड रोवर घेतात काय? आमचा सत्या किंवा सुंदरतिकडे जातात काय आणि तिथले प्रमुख होतात काय? हे सगळं समीकरणच थोडं गुढ आहे.पण तिथल्या सामाजिक जडणघडणी मधे काही तरी वैशिष्ट्य असेल अस नक्की वाटत.

मला असं वाटत व्यक्ती आणि समाज हे खुप एकरूप असतात. ऊत्तम समाज जसा सर्वोत्तम व्यक्तीनी घडतो तसच पुरुषोत्तम व्यक्तिमत्व प्रगल्भ समाजा मुळ घडतं.

राष्ट्र उन्न्तिचा मार्ग व्यक्ती निर्मणा कडून समाज उभारणी च्या मार्गाने जातो हेच संघ कित्येंक वर्ष सांगतोय,करतोय.

पण मग मी विचार केला की कमी वयात ही यश मिळत हे खर, मग हे कस घडतं?

तेव्हा लक्षात येत की तूम्हाला जेव्हा एक्सपोजर मिळत किंवा तुम्ही ते मिळवता. सतत काम करत राहता,ते करता ना चुकता,त्यातुन शिकता. नविन माणसाना भेटता. ती माणस पुस्तकं वाचल्या गत वाचुन काढता. अपमान पाण्याच्या घोटा बरोबर पिऊन टाकता आणी रक्ताचा घाम करुन काम करत राहता. गोष्टी ओब्सर्व करता. कान आणि डोळ्या बरोबर मनाची आणि बूद्धिची दार सताड उघडी ठेवता. तेव्हा तुमच मोजल जाणार वय भले एक वर्षानी वाढेल पण तुमच्या प्रगतीच आणी प्रगल्भतेच वय प्रत्येक क्षण, प्रसंग,समस्या आणी संकटा गणिक वाढलेल असत.

70 वर्षे होऊनही आयुष्यच तत्वद्यान दासबोधात शोधणार्या आजोबा पेक्षा 17 व्या एव्हरेस्ट सर करणारयला दासबोध न वाचता ही समर्थ कळतात हेच खर गमक आहे.

हे समाज रुपी पुरुषा इथं च तर खरी मेख आहे.
“कुणी ह्या तुफानला अनुभव देत का रे अनुभव”.

कुणीही देणारं नाही.

कारण अनुभव आणि अनुभुति ह्याला वय नसत,वेळकाळ नसते. कसल मोजमप नसत. कसलेही मापदंड नसतात.

अनुभव विकत मिळत नाही, फुकट ही मिळत नाही.

तुमची दोन वय असतात. एक शरीराच दुसर अनुभवाच. पहील निसर्गदत्त देणगी दुसर स्वकर्माची ठेव. सतत अव्याहत व्याज देणारी.

पुढल्या वेळी ते सद्गृहस्थ भेटले की आमचं दुसर वय त्याना सांगतो.

आपल्या घरी निघालेल्या बाप्पा ला एकच मागणी$$

“प्रतिभेला कमतरता नसणार्या आमच्या समजाला प्रगल्भता दे रे महाराजा…..”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s