अंतर …. ऊंची आणि खोली मधलं !

परवा विमानातून दिवसा प्रवास करायचा योग आला. खिडकी ची सीट मिळाली नाही. पण पुरेसा प्रकाश असल्यानं बाहेरचं दिसत होतं.

धाव पट्टीवर विमान एका बे मध ऊभं होत. आमच्या आधी इतर एयर लाईन्स चे विमान उड्डाण करत होते. अचुक 06:20 मिनीटे झाल्यावर आमचं प्लेन मुख्य धावपट्टी वर आल. प्रचंड वेग पकडून धावू लागल तस आपसुक डोळे खिडकी कडे वळले.

आता एव्हाना विमान आकाशात झेपावलं होत. जमीन सोडतानचा तो क्षण नक्किच विलक्षण असतो मग तुम्ही कितिही वेळेला प्रवास केला असुदे. पण आपल सर्वस्व आपण कुणाला तरी देऊन, त्याच्या वर विश्वास ठेउन आपण त्याक्षणी अवकाशात झेपावत असतो.

प्रत्येक क्षणी विमान वर जात होत तस पृथ्वी च थोड जास्त मोठ क्षेत्र दिसू लागत होत. आता विमान पुन्हा पृथ्वीला समांतर झाल आणी स्थिरावल. आता पुढच्या काही क्षणात ते आणखी वर जाणार होत आणी मग फक्त ढग च दिसणार होते. अगदी ढगांवर स्वार होण्यच फिलींग येणार होतं. पण तितक्यात एक विचार मनाला हळुच स्पर्श करुन गेला. एखादा सूर्यकिरण ढगावर पडून त्याचा पृथक्करण व्हावं असच कहीच विचारच पृथक्करण घडलं असेल.

खाली बघताना कित्येक किलोमीटर अंतरापर्यंत ची यमुना दिसत होती. रस्ते,वाहन, गर्दी सगळ काही फक्त इतक्या उंची वरुन हे सगळ बघताना अवाका वाढला होता.

खालून जेव्हा आपण विमाना कडे बघतो तेव्हा आपल्याला फक्त ते विमान दिसत. पण वरुन खाली बघताना खुप काही दिसत. फरक फक्त दोन शब्दांचा नाहीय खुप काही बदलत.

एकिकडे जीला उंची म्हणतो तीच दुसरी कडे खोली असते. आणी ह्या दोन्ही मधे तेच स्तब्ध अंतर….

त्या उंचीवर जाऊन जे दिसत ते खालून दिसुच शकत नाही. हे अंतर पार करुन जाण म्हणजेच आपल आयुष्य असेल कदाचीत.

एकदा एखादी उंची गाठली की खुप प्रश्न अपोआप सुट्तात असल ऐकलं होत. मला वाटत ते अपोआप सूटत नाहित. ते सहज गत्या सोडवण्याचा दृष्टीकोन मिळतो.

हा फक्त अपेक्षीत उंची गाठली तरी पुन्हा खाली कोसळण्याची शक्यता सतत जीवंत ठेवावीच लागणर. जसे विमानात मधून मधून टरब्युल्ंस येतात अगदी तसच.

एकी कडे मुळे खोलवर पसरलेलं झाड खुप वर्ष जगत अस विचार करणार्या मला उंचीच महत्व सांगणारा तो एक विलक्षण क्षण होता.

योगयोग का काय माहीत नाही पण खालच दृश्य दिसण बंद झाल तेव्हा हेडफोन मधे कडवं वाजत होत.

“सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती.
पंखास या बळ दे नवे,झेपावण्या आकाश दे

जे सत्य सुंदर सर्वथा,आजन्म त्याचा ध्यास दे…”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s