आज सकाळ तशी कंटाळा घेऊनच आली . गच्च भरलेलं आभाळ , बोचरी थंडी, आणि मनात विचारांच काहुर. पाऊस जरी आज अनाहूत असला तरी, मनातील विचारांचे धग दोन तीन दिवसांन पासुन जमत होते. १२ वी चा निकाल हे त्याच प्रमुख कारण, सोबत पालक ह्या प्रजातीच अज्ञान, उतावळेपण, विद्यार्थ्यांचं प्रचंड गोंधळ, क्लासेस च निर्ल्लज मार्केटिंग आणि सर्वात मोठा परिपाक म्हणजे मुलांना दाखवला जाणारा चुकीच्या, अवाजवी अपेक्षा आणि त्यातुन सुरु होणारा “मृगजळाचा पाठलाग”.
गेली चार वर्षे मी हे सगळं एक शिक्षक म्हणून बघतोय. हल्ली मला ह्या पालकांची अवस्था पूर्ण टक्कल पडूनही ते लपण्यासाठी टोपी घालुन फिरणाऱ्या एखाद्या मध्यमवयीन गृह्स्तागत वाटू लागलीय. “मुल देवाघरची फुलं ” ह्यातलं फुल हे इंग्रजी आशयान येत असाव अशी खात्रीच पटू लागलीय. अच्छे दिन वाल शासन आमच्या गोत्राच(ब्रिगेडला अभिप्रेत असलेल हे गोत्र नव्हे, स्वयं-सेवक परंपरेला आधारभूत असणार गोत्र )असल्यान काहि तरी बदल करतील आशी आपेक्षा ह्या वर्षी तरी पूर्ण होताना दिसत नाहीय. काहि मुद्दे विचार करण्यासारखे वाटू लागलेत:
१) शिक्षणाचा मूळ हेतू काय?
२) शिक्षण पद्धती आणि संस्था ह्यांना पोखरणाऱ्या वाळवीच काय?
३) शिक्षण ही औपचारिकता आहे की आवश्यकता?
४) शिक्षण देणारे शिक्षक आणि शैक्षणिक संस्था ह्यांच्या दर्जाच काय?
५) शिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगाराच काय?
६) स्किल बेसड एजुकेशन च ठीक आहे. पण स्कील्लिंग च्या विल्लीग्च काय?
प्रतिभेला कमतरता नसलेल्या आमच्या ह्या देशात प्रगल्भता हरवून गेलीय असच वाटू लागल आहे. ओंगळवाणी पुस्तकं असोत , त्रोटक आणि पूर्व ग्रह दुषित मनानं तयार झालेला अभ्यासक्रम असो , मग पाचवी ते नववी पर्यंत हर एक प्रमाणपत्र इच्छुकाला ते देण्याची शासकीय योजना असो सगळीकडेच “सर्व शिक्षा अभियान” आपला प्रभाव दाखवत आहे. अशा “सर्व भिक्षा अभियानाच” मुळ शोधलं तर ते भरमसाट झालेली कॉलेज आणी त्यावरून तयार झालेलं आर्थिक समीकरण च असेल आस वाटू लागतं. हे सगळ एक प्रकारे ३६५ दिवस चालणार एजुकेशन प्रीमियर लीग च म्हणावं लागेल. इथं ही सगळ ठरलेलं असतं, डोनेशनच रेट, परिक्षेचे डेट (निदान महिना), ओरल चे मार्क आणि सगळ्यात महत्वाचं कितीही अपयशी असलं तरी काही वर्षानी पदवीधर झाल्याच प्रमाणपत्र. अगदी जात्यात धान्य टाकून जात फिरवलं की कस धान्य बाहेर येणारच तसचं.
दिवसें दिवस दर्जा घसरत चालला आहे, ह्याच उत्तम उदाहरण म्हणजे शासनाने कमी केलेला पात्रतेचा निकष. १२ वी नंतर अभियांत्रिकीला जाण्याचा पात्रता निकष सतत कमी केला गेलाय,त्यात भर म्हणून केमिस्ट्री ने पात्र होत नसेल तर वोकेशनल विषयाचे मार्क गृहीत धरून पात्र केल जातय.
हल्ली मुलांमध्ये फक्त पात्र होण्याचे उद्दात्त ध्येय दिसून येते. काहीही झालं तरी प्रवेश निश्चितच असतो. मग हे गुढग्याला बाशींग बांधलेले अभियंता प्याकेजच्या गप्पा मारताना बघून मला उंटाच्या ढुंगणाचा मुका घेण्याचा प्रयत्न करणार्या पंचतंत्रातील पात्राची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
ह्या वर्षीचा निकाल ही खूप धोक्याची घंटा आहे. मनोरंजन किंवा करमणूक म्हणून समोर आलेला तो एक App स्वतःचे अदृश्य, अनाकलनीय आणि दूरगामी परिणाम ह्या वर्षी दाखवू लागलाय. १० वी ला भरमसाट मार्क पडलेले आमचे बरेच वीर आत्ता पत्त्यासारखे कोसळले आहेत. मग ते कोणत्या कारणामुळे हा खरा प्रश्न आहे. ह्याचा अर्थ एक तर आधी दिलेले मार्क खोटे होते किंवा आत्ता ते दुर्लक्ष करत होते. बरं विद्यार्थी ठिक आहे काही शिक्षक जेव्हा मी बघितले जे “जेइइ” रद्द झाली म्हणून आनंद व्यक्त करत होते. त्यांची तर मला कीव येते . क्लास घेण हा तुमचा व्यवसाय असू शकतो पण तो मन लावुन केला गेला पाहिजे. वासरात लंगडी गाय शहाणी आसा नाही.
असं म्हणतात की एका पिढीन दुसऱ्या पिढी चांगल काही तरी द्यावं. मला नाही वाटत आपण मागे चांगल काही तरी ठेवतोय. मी शोधतोय, तुम्हाला सापडलं तर मला ही सांगा. “पालक “नावाची भाजी आणि माणस हल्ली मला तरी नकोशी झाली आहेत. काहि च वर्षात वाढत जाउन साताऱ्या ला येउन पोहोचणाऱ्या पुणाच्या गर्दीत मिसळून टाकण्यासाठी जे मुलांना शिकवतात अश्या एका जरी पालकान हा लेख वाचला तरी मला फोन करा “निद्रीस्त झालेल्या भावना आणि प्रगल्भता जागृत करण्यात मला तुमची मदत हवीय .
आपला,
प्रसन्न संजीव जोशी.
९८२०२७२०४७